नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील महेश भेळभता दुकाना शेजारील दोन तीन गोडाऊनसह आजूबाजूच्या दुकानांना शुक्रवार (दि.21) रोजी पावणे बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकच्या पिंपळगाव मध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये बांबूच्या गोडाऊनला आग लागल्यानंतर आजूबाजूचे काही दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून आग वीजवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बॅटरीचे दुकान, बांबूचे गोडाऊन आणि भेळभात्याचे गोडाऊन जळून खाक झाले आहेत.