Nashik farmers hunger strike
देवळा येथे शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी आदी.  (छाया ; सोमनाथ जगताप)
नाशिक

Nashik | शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे या मागणीसाठी देवळा पाच कंदील येथे उपोषण

पुढारी वृत्तसेवा

देवळा : देवळा तालुका कॉंग्रेस पक्षातर्फे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे या मागणीसाठी शुक्रवारी दि. २६ रोजी देवळा पाच कंदीलवर लाक्षणिक उपोषण सुरू केले केले. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनाता म्हटले आहे की, देशात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करून अन्न धान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांशी उदयोग धंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर आवलंबून आहे. शेतकरऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्धवस्त होईल. शेतकरी जगेल तरच देश जगेल असे असतांना सुध्दा केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला असतांना शासनाच्यावतीने शेतकर्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलली जात नाही.

सायंकाळपर्यंत उपोषण

अनेक ठिकाणी शेतकरी दुष्काळ, बेमोसमी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळेवर्ग संकटात सापडलेला आहे. शेतकरी आत्महत्या होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती व्हावी याकरिता देवळा तालुका कॉंग्रेस पक्षातर्फे आज शुक्रवारी दि. २६ रोजी सकाळी १० ते संध्या. ५ वाजेपर्यंत देवळा पाचकंदील येथे एकदिवसीय उपोषण करण्यात येत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यांचा उपोषणाला पाठिंबा व सहभाग

यात तालूका अध्यक्ष दिनकर निकम, समन्वयक स्वप्नील सावन्त, कार्याध्यक्ष दिलीप आहेर, प्रांतिक सदस्य दिलीप पाटील, अरुणा खैरनार आदींसह संजय साळवे, पंडित निकम, संजय पवार, कैलास शिरसाट, प्रवीण सूर्यवंशी, बाळासाहेब खैरनार, गणेश देवरे, तुषार शिंदे, विनोद आहेर आदींनी यांनी सहभाग नोंदवत उपोषणाला आपला पाठिंबा दर्शवला.

SCROLL FOR NEXT