मेशी : येथील यशवंत भिला शिरसाठ (३३) हा युवा शेतकरी आखतवाडे (बागलाण) येथे काकाच्या शेतात रोटाव्हेटर फिरवत असताना त्यात अडकून मृत्यू झाला. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. यशवंत यांचा तोल जाऊन ते थेट रोटाव्हेटरवर पडल्याने त्यांच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या. रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यशवंतच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सोनवणे करीत आहेत.