नाशिक रोड: उपनगर कक्षाला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ केव्ही टाकळी विद्युत उपकेंद्रातून निघणार्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीला स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या काढणे, विद्युत यंत्रणेची दुरुस्ती आदी कामांसाठी नाशिक शहरासह उपनगर भागात देखील रविवारी (दि. १८) सकाळी ८:३० ते दुपारी १:३० दरम्यान विद्युत पुरवठा टप्याटप्याने बंद राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
उपनगरच्या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रातून नाशिक रोड परिसरात वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे गांधीनगर, अभीषनगर, पंचशीलनगर, दीपनगर, विद्युत कॉलनी, आंबेडकरनगर येथील वीजपुरवठा दिवसा बंद राहणार आहे. समतानगरातील टाकळी रोड, जामकर मळा, शेलार फार्म, इच्छामणी मंदिर परिसरातील सिंधी कॉलनी, खोडदेनगर, व्यापारी बँक परिसर, आम्रपाली, जुनी चाळ येथील वीजपुरवठा दिवसा खंडित राहील. याचबरोबर डीजीपीनगर, रविशंकर मार्ग, वडाळा शिवार, गांधीनगर, आर्टिलरीलगतचा मनोहर गार्डन, जयभवानी रोड, जेतवननगरासह नाशिक-पुणे रोड भाग, उपनगर पोलिस ठाणे, आयएसपी क्वार्टर आदी भागातील वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणच्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.