Nashik Municipal Election Result 2026 Women Winners 
नाशिक

Nashik Municipal Election Result 2026 Women Winners: नाशिक महापालिकेत प्रबळ 'स्त्री शक्ती'चे वर्चस्व

निकालानंतर कोणताही पक्ष विजयी घोडदौड करीत असला तरी महापालिकेची प्रबळ शक्ती ही 'स्त्री शक्ती' लक्षवेधी ठरली आहे

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे:

एकूण प्रभाग ३१ मध्ये १२२ सदस्य

एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार

पुरुष मतदारांची संख्या ७ लाख ४११

महिला मतदारांची संख्या ६ लाख ५३ हजार ५८७

७३५ उमेदवारांपैकी १९० महिला उमेदवार निवडणूकीच्या रींगणात

१२२ नगरसेवकांपैकी ६७ महिला नगरसेवक विजयी

नाशिक : अंजली राऊत

नाशिक शहरातील महिलांच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, नागरी सुविधा आणि एकूणच शहरी प्रशासन या विषयांवर मतदारांचे लक्ष केंद्रीत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नांवर कोणत्या पक्षाने आणि उमेदवाराने काय ब्लू प्रिंट दाखवली? या बाबी मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरल्या. त्यामुळे जवळपास ८ वर्षानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक झाल्याने शहराला आता लोकप्रतिनधी मिळणार आहे. यंदाची ही निवडणूक शहराच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची होती. निकालानंतर कोणताही पक्ष विजयी घोडदौड करीत असला तरी महापालिकेची प्रबळ शक्ती ही 'स्त्री शक्ती' लक्षवेधी ठरली आहे.

नाशिकच्या हायव्होल्टेज लढतीत महिला उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. निकालातून यंदा 'स्त्री शक्ती'चा ठळक प्रभाव दिसून आला आहे. महिलांच्या प्रश्नांना महिलाच अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात, या विश्वासावर महिला मतदारांनी मोठ्या संख्येने महिला उमेदवारांना मतदान केले. त्याचा थेट परिणाम म्हणून महापालिकेत महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या वाढले असल्याचे दिसून आले आहे.

महिला मतदारांमध्ये विश्वास

निवडणूक प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिला सुरक्षितता, अंगणवाडी, बचत गट, रोजगार आणि मुलींचे शिक्षण त्यांची सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर महिला उमेदवारांनी थेट संवाद साधला. घराघरांत जाऊन स्थानिक प्रश्न जाणून घेतले आणि त्यावर उपाययोजना करण्याची ठोस आश्वासने दिली. त्यामुळे महिला मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला.

महिलांचे जागरुकपणे मतदान

३१ प्रभागांपैकी तब्बल ११ प्रभागांमध्ये पुरुष उमेदवारांवर मात करत महिला उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण असले तरी हा निकाल बदलत्या सामाजिक दृष्टिकोनाचे द्योतक मानला जात आहे. महिला मतदारांनीही यावेळी अधिक जागरूकपणे मतदान केल्याचे चित्र दिसून आले. महिलांच्या दैनंदिन अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न आणि कुटुंबाशी निगडित समस्या समजून घेणारे नेतृत्व आवश्यक असल्याची भावना मतदानातून व्यक्त झाली. 'आपल्यासारखीच एक महिला आपल्या प्रश्नांसाठी ठामपणे उभी राहू शकते' अशी भावना महिला मतदारांनी दिसून आली.

विजयी महिला नगरसेविकांसमोर अपेक्षांचे राहणार आव्हान

महिला, बालक आणि कुटुंबकेंद्रित प्रश्नांना प्राधान्य देत विकासात्मक कामांना गती देण्याची जबाबदारी विजयी महिला नगरसेवकांवर राहणार आहे. यामध्ये ठिकठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था, पाणीप्रश्न, भाजीबाजारातील महिला भाजीविक्रेत्यांना भेडसावऱ्या मूलभूत समस्या महिला नगरसेवक सोडवतील अशी अपेक्षा आहे. नाशिक महापालिकेतील हा बदल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाचा सकारात्मक संकेत मानला जात असून, भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निर्णायक निकाल ठरणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT