नाशिक: म्हसरूळ परिसरात प्रचार दौऱ्यादरम्यान मतदारांशी भेट घेताना उमेदवार गणेश गिते Pudhari
नाशिक

Nashik East Assembly Election | विकास आणि गणेश गिते एकाच नाण्याच्या दोन बाजू

भक्कम पाठीशी राहण्याचा म्हसरूळकरांचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सत्यता, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेने नाशिक पूर्व मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प घेणारे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांना भक्कम साथ देण्याचा संकल्प म्हसरूळच्या रहिवाश्यांनी घेतला आहे. विकासाचे दुसरे नाव गणेश गिते असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते यांनी सोमवारी (दि.११) मारुती मंदिर, म्हसरूळ प्रभाग क्र. १ परिसरातून प्रचारास सुरुवात केली. दौऱ्यात मारुती मंदिर, म्हसरूळ गाव, वैदुवाडी, नायरा पेट्रोल पंप, शिवा हॉटेल, ओंकार चौक, साई मंदिर, रिलायन्स पेट्रोल पंप, संपर्क कार्यालय, आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग, कंसारा माता चौक, ए.टी. पवार आश्रम शाळा मार्ग, रोहिणी हॉटेल या ठिकाणी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. गितेंच्या प्रचाराचा धडाका सुरू असून त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अनेक माता-भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. ज्येष्ठांकडून त्यांना विजयाचे आशीर्वाद मिळत असून विविध सामाजिक संघटनांनी गिते यांना पाठिंबा दिलेला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा संकुलाने नाशिकची जागतिक ओळख

गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कार्यकाळात म्हसरूळ परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारून नाशिकला क्रीडा केंद्र म्हणून ओळख निर्माण केली. पेठरोडच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेत, त्यांनी वाढत्या रहदारीचा विचार करून नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. त्यामुळे अशाच विकासासाठी मतदारसंघातील मतदार गितेंच्या पाठीशी असल्याचे मतदारांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT