नाशिक

नाशिक : शिंदे गावच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे ज्ञानेश्वर जाधव विजयी

गणेश सोनवणे

नाशिकरोड , पुढारी वृत्तसेवा ; येथील शिंदे गाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर जाधव विजयी झाले. सत्ताधारी गटात फुट पडून त्यांचे दोन उमेदवार रिंगणात उतरले. विरोधी संजय तुंगार गटाने ज्ञानेश्वर जाधव यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सुप्रिया तुंगार यांचा पराभव झाला.

विद्यमान उपसरपंच अनिता तुंगार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी ज्ञानेश्वर जाधव व सुप्रिया तुंगार यांचे दोन अर्ज दाखल झाले. त्यात निवडणूक होऊन ज्ञानेश्वर जाधव यांना दहा तर सुप्रिया तुंगार यांना सात मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच गोरख जाधव व अध्याशी अधिकारी नरेंद्र शिरसाट यांनी शिंदे गावचे उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची निवड झाल्याची घोषणा केली. निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला.

गेली अडीच वर्षांपूर्वी शिंदे ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस नेते रतन जाधव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी प्रणित ग्रामविकास पॅनल ला १७ पैकी १४ जागा मिळाल्या. तर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांच्या नेतृत्वाखाली धुरंदर पॅनल ३ जागा मिळाल्या होत्या.

मात्र काल उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटात फुट पडून सत्ताधारी गटाचे जाधव व तुंगार यांचे दोन अर्ज दाखल झाले. निर्धारित वेळेत एकही अर्ज माघारी न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात सुप्रिया तुंगार यांना७ तर ज्ञानेश्वर जाधव यांना संजय तुंगार यांच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने १० मते मिळून ते विजयी झाले. यावेळी अशोक बोराडे, बाजीराव जाधव, नितीन जाधव, तानाजी जाधव, गणपत जाधव, भाऊराव धुळे, मोतीराम जाधव, संजय तुंगार, अनिता तुंगार, वंदना जाधव, शालिनी तुंगार, हिराबाई जाधव, रीना मते अर्चना जाधव, संगीता बोराडे अश्विनी साळवे.निलेश जाधव, उत्तम जाधव, समाधान तुंगार संतोष साळवे,सुरेश जाधव, प्रकाश मते आदिंसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT