महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना Pudhari News Network
नाशिक

Nashik | जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचा एल्गार; आज काळ्या फिती लावून करणार काम

नाशिक : प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन; 15 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कृषी सहाय्यकांच्या अडचणी १५ दिवसांत सोडविण्याचे आश्वासन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे.

सोमवारपासून (दि.५) काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात होईल. १५ मेपर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास १५ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी या पूर्वी आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन १५ दिवसांत मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत मागण्यांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलनात कृषी सहाय्यकांनी सहभागी होण्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना नासिक शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ गावीत, कार्याध्यक्ष भास्कर आव्हाड, जयकिर्तीमान पाटील, सरचिटणीस दुर्गेश बच्छाव, कोषाध्यक्ष तुषार गवळी आदींनी केले आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

  • कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी

  • कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करा

  • सर्व कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने लॅपटॉप द्यावा

  • कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा

  • निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतूद करावी.

  • कृषी विभागाच्या आकृतिबंधास तत्काळ मंजुरी द्या.

  • कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांना पदोन्नती द्यावी.

  • पोकरा योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीपणे भरावी.

  • नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करा.

  • सिल्लोडमधील कृषी सहाय्यकांच्या आत्महत्येची चौकशी करून संबंधितांवर कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT