Online Fraud pudhari photo
नाशिक

Nashik Online Fraud | एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅक; शेतकऱ्याच्या खात्यातून 5 लाख ऑनलाइन उकळले

दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याची मोबाईल हॅक करून तब्बल ४ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

Dindori Farmer Mobile Hacked

वणी : सायबर गुन्हेगारीचे लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले असून दिंडोरी तालुक्यातील एका शेतकऱ्याची मोबाईल हॅक करून तब्बल ४ लाख ९९ हजार ९९८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये अज्ञात व्हॉट्सअॅपधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील दगड पिंप्री (पोस्ट पिंप्री अंचला) येथील रहिवासी वसंत बंडू चौधरी यांच्या मोबाईल क्रमांक ९४२२७६८९९८ वर ८२५०५११२९३ या क्रमांकावरून 'YONOSBI.apk' नावाची फाईल व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्यात आली. संबंधित फाईल उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला.

सायबर भामट्यांनी मोबाईलमधील माहितीचा अनधिकृत ताबा घेत चौधरी यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९९ हजार ९९८ रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करून त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी वसंत चौधरी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या .apk फाईल, लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नये, तसेच बँकेशी संबंधित कोणतीही फाईल उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT