प्रातिनिधीक छायाचित्र 
नाशिक

21 stray dogs poisoned nashik | चिकनमध्ये विष मिसळून २१ भटकी कुत्री, २ मांजरांना मारले : देवळा तालुक्यातील धक्कादायक घटना!

प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार संशयित दोघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

देवळा : गावातील भटकी कुत्रे व मांजरी यांच्यावर विषप्रयोग करून त्यांना ठार मारल्याची घटना लोहोणेर ता.देवळा येथे घडली असून त्यात २१ भटकी कुत्रे व दोन मांजरी मृत्युमुखी पडल्या. मुक्या प्राण्यांवर अशा पद्धतीच्या निर्दयी घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्राण्यांचा क्रूरतेने छळ या प्रतिबंधक कायद्यानुसार गावांतील संशयित दोघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर ता.देवळा येथे २१ भटकी कुत्रे व दोन मांजरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी देवळा पोलिसांना मिळाली. एवढया मोठ्या संख्येने प्राणी मृत झाल्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, पोलीस सुरेश कोरडे यांनी तात्काळ लोहोणेर येथे भेट दिली व याच्यामागची कारणांचा शोध घेतला असता त्यांना याबाबत माहिती मिळाली.

ती अशी की , बुधवार (दि.१२) रोजी सायंकाळी गावातील रमेश दादाजी अहिरे व मुकेश उर्फ पापा परदेशी दोन्ही राहणार लोहोणेर यांनी चिकनमध्ये विषारी द्रव्य मिसळून ते गावातील भटक्या कुत्र्यांना व मांजरीना खाऊ घातले. यामुळे गावातील वीस कुत्रे व दोन मांजरी मृत झाल्या. येथील सफाई कर्मचारी कांतीलाल साळुंखे यांनी सांगितले की सकाळी सफाई चे काम करत असताना इतक्या मोठ्या संख्येने कुत्रे आणि मांजरी मृत झाल्याचे पाहून या सर्व मृत प्राण्यांना जेसीबीच्या साह्याने खड्डा करून जमिनीत पुरले.

यादरम्यान सदर पोलीस अधिकारी तपासासाठी जात असताना बालाजी मंदिराजवळ एक कुत्रा तडफडत असल्याचे तसेच तोंडातून फेस येत असल्याचे व त्यादरम्यान तो मृत्यू झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. सदर मृत कुत्रा पोलिसांनी ताब्यात घेऊन देवळा पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवत त्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

या सर्व घडामोडी लक्षात घेता लोहोणेर बिटाचे पोलीस शिपाई सुरेश कोरडे यांनी याबाबत देवळा पोलिसात फिर्याद दाखल केली असून, या फिर्यादीनुसार लोहोणेर येथील रमेश दादाची अहिरे व मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांनी संगणमत करून गावातील भटके कुत्रे व मांजरी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जाणून-मधून अत्यंत क्रूरतेने चिकन मध्ये विषारी पदार्थ टाकून व ते त्यांना खाऊ घातल्याने गावातील २१ कुत्रे व दोन मांजरी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले म्हणून या दोघांविरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT