Nashik Leopard Attack Goats Killed  Pudhari
नाशिक

Leopard Attack Nashik | सावकी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरी, बोकडाचा मृत्यू

गोठ्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याचा हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Nashik Leopard Attack Goats Killed

देवळा : सावकी येथील शेतकरी धर्मा काळू शिवले यांच्या गट क्रमांक १७९ मधील शेतात असलेल्या गोठ्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक बकरी व एक बोकड जागीच ठार झाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे १७ ते १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धर्मा काळू शिवले हे आपल्या शेतात वास्तव्यास असून त्यांनी गोठ्यात शेळ्या व बोकड बांधले होते. रात्रीच्या वेळी बिबट्याने गोठ्यात घुसून बकरी व बोकडावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की दोन्ही जनावरे जागीच दगावली.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी तसेच बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या व पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी धनंजय बोरसे, राकेश पाटील, प्रवीण शिवले, बापू बोरसे, राहुल शिवले व आदी पशुपालक शेतकरी करत आहेत.

दरम्यान , सावकी येथे दोन दिवसांपूर्वीच अरुणा भास्कर गोधडे या महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण सर्तकतेमुळे जीव वाचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT