स्थानिक गुन्हे शाखेचे व देवळा पोलिसांनी लोहोणेर ता. देवळा येथून जप्त केलेला अवैध काळा गुळ व इतर साहित्य समवेत पोलीस निरीक्षक राजु सुर्वे आदी.  ( छाया -सोमनाथ जगताप )
नाशिक

नाशिक : देवळा पोलीसांचा हातभट्टीवर छापा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (देवळा) : तालुक्यातील लोहोणेर शिवारात शुक्रवारी (दि ११) रोजी देवळा पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी करण्यासाठी लागणारा काळ गूळ व इतर साहित्य असा एकूण ६८ हजार २९० रुपये किमतीचा अवैध साठा जप्त केला. आरोपी विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध रित्या सर्रास उघड्यावर गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या बाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवारी (दि ११) रोजी देवळा तालुक्यातील लोहोणेर गाव शिवारात काही संशयीत हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य काळा गुळ व तुरटीचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा विनापरवाना कब्जात बाळगून विक्री करण्याचे उद्देशाने साठवणुक करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीसांनी याठिणी प्रदिप आनंदा बच्छाव, (वय ३८) यांच्या घरातील गोडऊन मध्ये छापा टाकला असता हातभ‌ट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे काळा गुळाच्या एकुण २४५ भेल्या (२२०० किलो), तसेच १०७ किलो तुरटी असा एकुण ६८,२९०/- रू. किं.चा अवैध साठा जप्त करण्यात आला. यातील इसम हा हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा वरील अवैध साठा विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगतांना आढळले. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोहवा गिरीष निकुंभ, सुभाष चोपडा, शरद मोगल तसेच देवळा पोलीस ठाण्याचे हवालदार गवळी, कोरडे, पोलीस नाईक मोरे, चव्हाण यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT