Crime News pudhari photo
नाशिक

Crime News | मेहुण्याकडून सालीचा चाकूने भोसकून खून

Crime News | भऊर फाटा येथील घटना, आरोपी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

देवळा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भऊर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून मेहुण्याने सालीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) सकाळी घडली. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला खामखेडा येथील ग्रामस्थांनी पाठलाग करत पोलिसांच्या ताब्यात दिले. माया हिचा विवाह श्याम आगनदास माळी (रा. धोडांबे) याच्यासोबत झाला होता. आरोपी श्याम हा भऊर फाटा परिसरात मजुरी करत होता. दारूसाठी तो पत्नीकडून पैसे घेत असल्याने कुटुंबात वाद होत होते. मारहाणीमुळे माया माहेरी निफाडला आली होती. ज्ञानेश्वर जाधव, पत्नी छायासह इतर नातेवाईक शुक्रवारी श्यामची समजूत काढण्यासाठी गेले होते. ते निखील आहेर यांच्या शेताजवळ थांबले असताना श्याम हा पुतण्या दादू माळीसोबत दुचाकीवरून आला. चर्चा सुरू असतानाच श्यामने मायाला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनू कराटे याने मायाला मागे ओढल्याने वार चुकला. त्यानंतर श्यामने छाया जाधव यांच्या छातीवर वार केला. गंभीर जखमी छाया हीस कळवण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत सोनू कराटे हा जखमी झाला आहे. घटनेनंतर श्याम पिळकोस खामखेडा परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी खामखेडाचे सरपंच अॅड. वैभव पवार यांना दिली. अॅड. पवार यांच्यासह माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे व सौरभ शेवाळे यांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT