देवळा : बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सभापती योगेश आहेर. समवेत माजी सभापती केदा आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, विजय सोनवणे आदी. Pudhari News Network
नाशिक

Nashik Deola APMC : देवळा बाजार समितीला 28 लाख 51 हजारांचा नफा

देवळा बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

देवळा (नाशिक) : देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीला आर्थिक वर्षअखेर 28 लाख 51 हजार 445 रुपये नफा झाला अशी माहिती सभापती योगेश आहेर यांनी दिली. या बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 23) सभापती आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सचिव माणिक निकम यांनी अहवालवाचन केले.

या वार्षिक सभेत संचालक शिवाजी पवार यांनी, कांदा उत्पादक शेतकर्‍यांची गंभीर समस्या लक्षात घेता त्यांनी कांदा निर्यात कुठल्याही अटीशर्ती नियमांशिवाय झाली पाहिजे. कांदा निर्यातीसाठी केंद्र शासनाने अनुदान द्यावे, गेल्या काही दिवसांत तोट्यात विकलेल्या कांद्याला एक हजार 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी करत ठराव करण्यात आला. बाजार समितीच्या निंबोळा उपबाजार आवारासाठी गावठाण जागा कायमस्वरूपी मिळावी यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावे यावर चर्चा झाली. यावेळी माजी सभापती केदा आहेर, उपसभापती शिवाजी अहिरे, संचालक भाऊसाहेब पगार, विजय सोनवणे, अभिमन पवार, अभिजित निकम, धनश्री आहेर, विशाखा पवार, दिलीप पाटील, दीपक बच्छाव, शाहू शिरसाट, रेश्मा महाजन, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, संजय शिंदे, निंबा धामणे, भावराव नवले आदींसह सभासद व मविप्र संचालक विजय पगार, बाजार समितीचे माजी संचालक नंदीश थोरात, खर्डे विकास सोसायटीचे चेअरमन भरत देवरे, कैलास निकम आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT