त्र्यंबकेश्वर (नाशिक): तालुक्यातील उंभ्राडे (कळमुस्ते) येथे सीटीआर कंपनीच्या सीएसआर फंडातून हनुमान मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा गुरुवार (दि. १) पार पडला. गुरुवारी हनुमान प्राण प्रतिष्ठा हवन, पूजन व महाप्रसाद वाटप करण्यात आली.
हनुमान मुर्ती प्राण प्रतिष्ठा या धार्मिक सोहळयाकरीता सीटीआर कंपनीचे सिनियर पर्सनल ॲडमिन मॅनेजर डी. के. चक्रवर्ती, जी. एस. नायडू, जी. व्ही. सहाणे आदी अधिकारी उपस्थित होते. सरपंच अशोक पोपट बुरंगे, पोलिस पाटील भिका सकु वाघ, मांगीलाल महाले, बापूसाहेब वनराई संस्था, वाल्मिक ऋषी मित्र मंडळ तसेच विविध शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते. तसेच सीटीआर कंपनीने सीएसआर फंडचे अंतर्गत सामाजिक जबाबदारी या नात्याने यापुर्वीही मौजे उंभ्राडे (कळमुस्ते) व इतर गावांचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. टॉयलेट बांधणे व इतर अनेक कामे केलेली आहेत.