नाशिक : प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्याला तब्बल साडेपाच लाखांच्या गुटख्यासह अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली असून, त्याच्याकडून इतरही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस अंमलदार मुक्तार शेख यांना माहितीदाराकडून, एका पिकअप (एमएच १५, एफव्ही २७५१) मध्ये प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू (गुटखा) अवैध विक्रीकरिता पेठ रोडकडून नाशिककडे येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना ही माहिती कळविल्यावर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलिस हवालदार रमेश कोळी, पोलिस अंमलदार मुक्तार शेख, राहुल पालखेडे, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, समाधान पवार आदींचे पथक नेमून काययदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पथकाने पेठ रोड, तवली फाटा येथथे सापळा रचून पिकअपसह संशयिताला ताब्यात घेतले. वैभव सुनील क्षीरसागर (२५, रा. मु. पो. उमराळे बुद्रुक, ता. दिंडोरी) या संशयिताला ताब्यात घेतले. पिकअपची झडती घेतली असता, त्यात बेकायदेशीरपणे विक्रीकरिता नेत असलेला पाच लाख ४५ हजार ६४४ रुपये किमतीचा गुटखा आढळला. याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, हा गुटखा गुजरातमधील सुतारपाडा येथून आणल्याचे त्याने सांगितले. संशंयिताकडून सात लाख रुपये किमतीचा पिकअप आणि साडेपाच लाख रुपयांचा गुटखा असा एकूण १५ लाख ४५ हजार ६४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस हवालदार रमेश कोळी यांच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.