नाशिक : तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणा-या सात सराईत गुडांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. हे तडीपार शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत होते.
पोलिसांनी गुरुपीत उर्फ गोपीबलदेव देवल (रा. घरकुल योजना, चुंचाळे) हा दि. २ ऑक्टोबर रोजी चुंचाळे शिवारामध्ये तडीपारी आदेशाचे उल्लंघन करताना आढळला. संदीप मारुती गायकवाड (रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) या सराईत गुन्हेगाराला दि. २४ ऑगस्ट रोजी तडीपार केले होते. मात्र तो शहरात वास्तव्य करताना सार्वजनिक शौचालयाजवळ इंदिरा गांधी वसाहतीत आढळला. सलीम उर्फ बाबा युसुफ शेख (रा. गुलशननगर, वडाळा गाव) याला दि. १० एप्रिल २०२४ पासून तडीपार केले होते. तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून न्यू प्रीतम हॉटेल परिसरात बेकायदेशीरपणे वावरताना आढळला.
शिवाजी पोपट गांगुर्डे (रा. विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर) याला दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी तडीपार केले होते. मात्र सावरकरनगरमध्ये बेकायदेशीर वावरताना आढळला. रोहित अशोक गायकवाड (रा. लहवित, देवळाली कॅम्प) हा तडीपारी आदेशाचे उल्लंघन करताना नाशिक शहरात आढळला. त्याला १० ऑक्टोबर २०२४ रोजी आयुक्तालयातून तडीपार केले होते. उपनगर पोलिस ठाणे हद्दीमध्ये बबलू रामधर यादव या तडीपाराला अटक करण्यात आली. देवळाली गाव नदीकिना-याजवळ दशक्रिया विधी शेड येथून ताब्यात घेण्यात आले. भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतून शोएब सादिक शेख (रा. जीपीओ, भद्रकाली) याला अनधिकृतरीत्या शहरात वावरताना ताब्यात घेण्यात आले. त्याला १५ सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र तो शालिमार परिसरात आढळला.