पंचवटीतील मेरी परिसरात युवकाचा खून झाल्यानंतर घटनास्थळी पाहणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी  (छाया : गणेश बोडके)
नाशिक

Nashik Crime Update | पंचवटीत सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाचा खून

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे पहाटे पाच ते साडे पाच वाजेच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव असून आर्थिक देवाण घेवाणातून सदर प्रकार घडला असल्याची चर्चा असून मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसांचा मुलगा आहे.

गगन प्रवीण कोकाटे (२५) असे मयत युवकाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच श्र्वान पथक देखील दाखल झाले आहे. संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT