वणी (नाशिक) : वणी येथील कड गल्लीत शुक्रवार (दि.28) रोजी दुपारी एकच्या दरम्यान जावयाने आते सासुवर चाकूने हल्ला केल्याने मंगल गणपत पवार ( वय ४०, रा. वणी) या गंभीर जखमी झाल्या.
गंभीर जखमी मंगल पवार यांना वणी ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मानेवर गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शुक्रवार (दि.28) रोजी दुपारी दत्तात्रय बाजीराव इकडे (वय 32, रा.नांदुरमधमेश्वर ता.निफाड) कडगल्ली येथे पत्नी बांळात झालेली असताना तिला भेटायला व न्यायला आलेल्या जावई व तीच्या घरच्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी मंगल पवार या देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. तो त्यांच्या मुलीला नशापान करून मारहाण करत होता, त्यावरून भांडण झाले.
दत्तात्रय यास त्यांच्या बायकोशी फोनवर बोलू देत नाही व सासरी पाठवत नाही यावरून राग आल्याने दत्तात्रय याने सोबत आणलेल्या चाकूने मानेवर वार केला. संशयित आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हल्ला करताना संबधीत व्यक्ती नशेत होता. मंगल पवार या गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने नाशिक येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. वणी पोलीस पुढील तपास करत आहेत.