नाशिक

Nashik Crime | जुने नाशिकमध्ये सात वाहने जाळली

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर गाव, सातपूर कॉलनी अन् आता जुने नाशिक परिसरात वाहने जाळपोळीची घटना समोर आली आहे. परिसरातील कुंभारवाडा येते रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी एक छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून नुकसान केल्याची घटना घडली.

जुने नाशिकमधील जुना कुंभारवाडा येथे घरासमोरील रस्त्यावर काही नागरिकांनी छोटा हत्ती टेम्पोसह सहा दुचाकी मंगळवारी (दि. २०) रात्री उभ्या केल्या होत्या. परिसरातील रहिवासी गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टवाळखोरांनी टेम्पोसह दुचाकींवर ज्वलनशील पदार्थ टाकून ही वाहने पेटवून दिली. त्यात या वाहनांचे जळून नुकसान झाले आहे. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यास माहिती कळवली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून, अज्ञात टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT