तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन File Photo
नाशिक

धक्कादायक ! तरुणींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या दोन तरुणी व एका तरुणाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना सिडकोत घडली.

ललित बाळासाहेब कुयटे (३३, रा. कार्तिकेयनगर, खुटवडनगर) गळफास घेऊन जीवन संपविणाऱ्याचे नाव आहे. त्याचा भाऊ रोशन कुयटे (२२) ने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मंगळवारी ललित हा सकाळी रूममधून बाहेर आला नाही. आपण गॅलरीतून खिडकी उघडून पाहिले असता ललित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला.

शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला असता त्याच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. आपणाकडे मैत्रीण जिज्ञासा पाटील नवरे, तिचा मित्र ओमकार शिंदे व मोना हे तिघे वारंवार पैशांची मागणी करत होते. तसेच मोनाकडे ललितचे रेकॉर्डिंग असल्याने तीही ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असे. जिज्ञासा व ओमकारला आपण ४० हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. दोघांना गाडी खरेदी करायची असल्याने त्यांना ७० हजार आणि नंतर एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तरीही ते वारंवार पैशांची मागणी करीत असल्याने आपण हे पाऊन उचल असल्याचे ललितने सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवल्याचे आढ‌ळले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जिज्ञासा पाटील नवरे, ओमकार शिंदे व मोना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT