चांगले शिकवत नसल्याने शिक्षकाला रॉडने मारहाण Nashik News
नाशिक

Nashik Crime News | चांगले शिकवत नसल्याने शिक्षकाला रॉडने मारहाण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुलाला चांगले शिकवत नाही अशी कुरापत काढून एका पित्याने शिक्षकाला रॉडने बेदम मारहाण करीत गंभीर दुखापत केल्याची घटना विहितगाव परिसरात घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित शरद कोठुळेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश भगवंत शर्मा (३९, रा. विहितगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने सोमवारी (दि. ५) सायंकाळी मारहाण केली. संशयित कोठुळे यांची पत्नी शर्मा यांच्याकडे आली. तसेच तुम्ही मुलांना व्यवस्थित शिकवत नाही, या गोष्टीचा राग माझ्या पतीला आला असून, ते तुम्हाला मारायला येत आहे. त्यामुळे तुम्ही घरातून निघून जा असे संशयिताच्या पत्नीने शर्मा यांना सांगितले. त्यामुळे शर्मा हे शिकवणी घेत असलेल्या खोलीत गेले. मात्र संशयित शरद कोठुळे याने तेथे जात लोखंडी रॉडने शर्मा यांना मारहाण केली. त्यात शर्मा यांच्या डोक्यास गंभीर मार लागला, तर पाय फ्रॅक्चर झाला. तसेच तुझा क्लास चालू देणार नाही अशी धमकी देत क्लासमधील सर्व मुलांचे पैसे दे असे सांगितले. त्यानंतर शरद यांना त्यांच्या नातलगांनी घरी नेले, तर शर्मा यांना त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा तपास उपनगर पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT