नाशिक : बोधले नगर येथील पेट्रोल पंपावर ग्राहकांवर हल्ला करत तलवार नाचवत दहशत निर्माण करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखवून ‘सचबोल पट्ट्याद्वारे’ चांगलाच फराळ दिला. या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मदन लक्ष्मण सोमवंशी असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने ९ नोव्हेंबर रोजी नाशिक- पुणे महामार्गावरील बोधले नगर येथील धात्रक पेट्रोलपंपावर कुटुंबासह दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या ग्राहकावर मदन लक्ष्मण सोमवंशी यांने तलवारीने वार केला होता. यावेळी ग्राहकाने हेल्मेट घातलेले असल्यामुळे त्यास इजा झाली नाही. त्यानंतर संशयिताने पेट्रोल पंप परिसरात तलवार नाचवून दहशत निर्माण केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गुंड मदन सोमवंशी यास ताब्यात घेत त्याला पोलिसी खाक्या दाखवत धडा शिकविला आहे.