Fraud Case file photo
नाशिक

Nashik fraud news | निवृत्त कॅप्टनची ९४ लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जमीन व्यवहारात बनावट कागदपत्रांच्या आधारे ९४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्रीरामण गोपाळ कृष्णन (६६, निवृत्त कॅप्टन, मर्चंट नेव्ही, रा. सोनेट व्हिला, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, झेफेरेमस (ब्रदर) जॉस, संजय जाधव, आनंद वळे, सोमनाथ रामचंद्र पिंगळे, निवृत्ती रामचंद्र पिंगळे, वैभव निवृत्ती पिंगळे, विशाल निवृत्ती पिंगळे, प्रीती मके, अश्विन मान व दुर्गा दत्तात्रय कड ही गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

वाडगाव (ता. नाशिक) येथील ३ हेक्टर ४.५ आर क्षेत्र विक्रीसाठी काढण्यात आले होते. या व्यवहारात संगनमत करीत फसवणूक केल्याचा आरोप आहे. फिर्यादीची मालकीच्या वाडगाव शिवारातील ३ हेक्टर ०४.५ आर क्षेत्राची विक्री करण्याचे उद्देशाने या नऊ जणांनी संगनमत करीत फिर्यादीला विश्वासात घेत मिळकतीची परस्पर विक्री करण्याचे कट कारस्थान रचले. खोटे कागदपत्र तयार करून व खोट्या स्वाक्षऱ्या करीत या क्षेत्राची खरेदी स्वतःच्या लाभात करून घेतली.

फिर्यादी परदेशात असताना त्यांच्या संमतीशिवाय आयसीआयसीआय बँक खात्यावर वेगवेगळ्या रकमा टाकून त्या परस्पर प्रीती मकेच्या बँक खात्यावर ५ लाख, अश्विन मान यांच्या बँक खात्यावर ९ लाख रुपये, वळे यांनी फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते खात्यावरून फिर्यादी हे परदेशात असल्याने त्यांनी १ जुलै २०२० रोजी २५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे दुर्गा दत्तात्रय कड हिच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेऊन फिर्यादीची ९४ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. गंगापूर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT