आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे संघटक पवन क्षीरसागर image source - X
नाशिक

Nashik Crime News : कुंटणखाना प्रकरणी पवन क्षीरसागरला अटक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : छत्रपती संभाजीनगर रोडवरील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात हायप्रोफाइल कुंटणखाना पोलिसांनी उद्धवस्त केल्यानंतर, हा कुंटणखाना आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्राचे संघटक पवन क्षीरसागर चालवत असल्याप्रकरणी पोलिसांनी क्षीरसागर यास गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी इतरही बड्या राजकीय मंडळींचा या कुंटणखान्यावर वरदहस्त असल्याचा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

नाशिकमध्ये हायप्रोफाइल सोसायटीत सुरू असलेल्या कुंटणखाण्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका बड्या राजकीय नेत्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पवन क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर या पूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तपोवन कपालेश्वरनगर येथील एका उच्चभ्रू असणाऱ्या नक्षत्र सोसायटीत एका महिलेने कुंटणखाना सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी धाड टाकून दोन पीडित मुलीना अटक केली होती.

पोलिसांना एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करीत कुंटणखाना चालविणारी संशयित कविता साळवे-पाटील हिच्यासह जाफर मन्सुरी याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. संशयित कविता साळवे-पाटील हिची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने पवन क्षीरसागर यांच्या मदतीने कुंटणखाना सुरू असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने क्षीरसागर यास तत्काळ ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT