Minor Abuse Mira Road Pudhari
नाशिक

Nashik crime news | ओझर हादरले, तीनवर्षीय चिमुरडीवर अत्याचार

१७ वर्षीय अल्पवयीन संशयित ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील नागेश्वर चौक परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने (विधिसंघर्षित बालक) तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ओझर पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत अवघ्या २० मिनिटांत संशयिताला ताब्यात घेतले. नाशिकच्या बाल न्यायालयाने संशयिताची सात दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश्वर चौक परिसरात पीडित बालिका आपल्या आई-वडिलांसह राहते. गुरुवारी (दि. २९) दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास ही चिमुरडी घरासमोर खेळत होती. यावेळी परिसरातच राहणाऱ्या आणि अकरावी सायन्समध्ये शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार लक्षात येताच पीडितेच्या आईने तत्काळ ओझर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, जितेंद्र बागूल आणि राजेंद्र डंबाळे यांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित अल्पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या दिसून आला. पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २० मिनिटांत शोध घेऊन संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

बाल न्यायालयात हजर

संशयित अल्पवयीन मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ३०) त्याला नाशिक येथील बाल न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची सात दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. या घृणास्पद प्रकारामुळे ओझर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT