Crime News  Pudhari
नाशिक

Nashik crime| 'फ्री स्टाईल' हाणामारी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई?

चौकशी समितीकडून चौकशी पूर्ण; सीईओंना सादर करणार अहवाल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : चांदवड तालुक्यातील उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मारकड व डॉ. दिनेश ससाळ या दोन डॉक्टरांमध्ये 'फ्री स्टाईल' झालेल्या हाणामारी प्रकरणात दोघांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत नियुक्त केलेल्या चौकशी समितीने चौकशी करून अहवाल तयार केला असून, शुक्रवारी (दि. २३) हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना सादर करणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. मारकड व डॉ. ससाळ आपसातील मतभेद आणि अन्य कारणांवरून दोघांमध्येही झालेली 'फ्री स्टाईल' हाणामारी झाली. त्यावेळी काही जणांनी सोडविण्याचा प्रयत्न केला, ही वार्ता गावात पसरल्यानंतर सलोख्याच्या संबंधांमुळे या प्रकरणावर गावकऱ्यांनी पडदा टाकला, परंतु हा वाद राजकीय पुढाऱ्यांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासनापर्यंत पोहोचला.

याबाबत लेखी तक्रार नसली तरी, ओमकार पवार यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखालील समितीने जाऊन या प्रकरणाची चौकशी केली. यात आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिचारकांचे जाब-जबाब घेतले. याशिवाय त्यांनी गावकऱ्यांशी देखील संवाद साधला. या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून, शुक्रवारी हा अहवाल पवार यांच्याकडे सोपविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT