गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे pudhari news network
नाशिक

Nashik Crime News | सराईत गुन्हेगाराने पोलिसाला भोसकले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात खून, दरोडे, हाणामारीच्या घटना नित्याच्याच झाल्या असून आता गुन्हेगारांकडून पोलिसांनाही लक्ष केले जात आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे यांच्यावर एका सराईत गुन्हेगाराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंचवटीत घडली आहे. (An incident of an innkeeper assaulting a policeman has taken place in Panchvati)

कर्तव्य पार पाडून सोनवणे घरी जात असताना त्यांना दिंडोरी नाका येथील गीता हार्डवेअरसमोर एक व्यक्ती हातातील चाकू फिरवत दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून आले. यावेळी सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधितास थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव ऊर्फ गट्ट्या (रा. अवधूत वाडी, पंचवटी) असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यास पकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी गट्या याने झटापट करत त्याच्याकडील धारदार चाकू सोनवणे यांच्या पोटात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच झटका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सोनवणे यांनी जखमी अवस्थेतच प्रसंगावधान राखत गट्या याचा पाठलाग करत त्याला पकडल्यानंतर पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पंचवटी ठाण्याचे नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून विकी जाधव ऊर्फ गट्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत. दरम्यान, सोनवणे यांनी जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविल्यामुळे त्यांचे पोलिस दलाकडून कौतुक केले जात आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता पोलिसांवरच जीवघेणे हल्ले केले जात असल्याने, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT