नाशिक : | सिडकोतील राणेनगर परिसरात भूखंड मालकाच्या नातलगाने इतरांशी संगनमत करून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केला. तसेच भूखंड मालक जागेवर गेले असता त्यांना दमदाटी करीत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयितांमध्ये शिवसेना उबाठा गटात प्रवेश केलेला पवन पवार याच्यासह त्याचा भाऊ विशाल पवार व इतरांचा समावेश आहे. त्यामुळे भूखंड माफियांनी शहरात पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे.
लीना प्रकाश लुल्ला (रा. दुबई, मूळ रा. जुहू, मुंबई) यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबाची पर्यटन क्षेत्राशी निगडीत कंपनी असून त्यात लीना, त्यांचे पती प्रकाश व दीर गूल उर्फ राजू लुल्ला हे संचालक आहेत. सन १९९२ मध्ये लुल्ला कुटुंबाने राणेनगर येथील सर्व्हे नं. ९०३/३३/२ मधील २१ हजार १२२ चौरस मीटर मिळकत खरेदी केली. त्यानंतर, लुल्ला दाम्पत्य व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झाले. ते परत येत नसल्याची संधी साधत त्यांचा दीर गूल लुल्ला याने वरील संशयितांशी संगनमत करुन संपूर्ण भूखंड हडपण्याचा कट रचला. बनावट कागदपत्रे तयार करून हा भुखंड संशयित हेमंत चव्हाण व किरण वाळके यांनी खरेदी केल्याचे भासवले. दरम्यान, लीना या सप्टेंबर महिन्यात भूखंडाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता त्यांना त्यांचा भूखंड दुसऱ्याच्या नावे असल्याचे समजले. तसेच भूखंडावर संशयितांनी अतिक्रमण करुन रिकामा कंटेनर ठेवून गंभीर गुन्हा होईल असे कृत्य केल्याचे दिसून आले. तेथील सुरक्षारक्षकांनी पवन पवार यांचा हवाला देत लुल्ला दाम्पत्यास धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे जागेबाबत समझाता करायचा असल्यास मिळकतीसाठी वापरेलेली रक्कम व पाच कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे.
इंदिरानगर पोलिसांनी गुल उर्फ राजू लखमीचंद लुल्ला, हेमंत पद्माकर चव्हाण, किरण दत्तात्रय वाळके, शकील अहमद नजीर अहमद, पवन पवार, विशाल पवार, प्रवीण किशनलाल बेंझ, सुभाष बाबूराव तमखाने, पवन दादाजी जाधव, सचिन भास्कर बच्छाव आणि सतीश माणिक भालेराव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. केली. त्याचप्रमाणे जागेबाबत समझाता करायचा असल्यास मिळकतीसाठी वापरेलेली रक्कम व पाच कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. इंदिरानगर पोलिसांनी गुल उर्फ राजू लखमीचंद लुल्ला, हेमंत पद्माकर चव्हाण, किरण दत्तात्रय वाळके, शकील अहमद नजीर अहमद, पवन पवार, विशाल पवार, प्रवीण किशनलाल बेंझ, सुभाष बाबूराव तमखाने, पवन दादाजी जाधव, सचिन भास्कर बच्छाव आणि सतीश माणिक भालेराव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.