नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील इंदूर येथून पकडले. इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सूर (३५, रा. इंदूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १४ फेब्रुवारीला मुंबई-आग्रा महामार्गावर कारवाई करीत कंटेनर पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन संशयितांना अटक केली होती. दोघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांना मुख्य सुत्रधार इसरार मन्सुरी याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार चेतन संवत्सरकर, नाईक योगेश कोळी, गिरीष बागूल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने इंदूर येथे सापळा रचला. तेथून संशयित मन्सुरीला पकडले. तो बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून विविध राज्यांमध्ये तस्करी करत असल्याचे उघड झाले. न्यायालयाने मन्सुरीला १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :