कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर टोळक्याचा गोंधळ, नऊ जणांना अटक File Photo
नाशिक

Nashik Crime | कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर टोळक्याचा गोंधळ, नऊ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळील परिसरात आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने एकमेकांवर हल्ले करीत तेथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि. ७) मध्यरात्री घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी नऊ संशयितांची धरपकड केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला करुन त्यानंतर वाहन-घरावर दगडफेक करीत तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गंगापूरच्या हद्दीतील कृषिनगर जॉगिंग ट्रॅक येथे सिद्धार्थनगर परिसरातील टोळक्याने धुडगूस घातला. टोळक्यातील संशयितांनी वादातून एकमेकांवर हल्ला करीत परिसरातील चार वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम ताठे, चंदू ताठे, संतोष ताठे, गणेश जाधव, शेखर उर्फ गोट्या ताठे, प्रफुल्ल पडांगळे, सागर जाधव, अमोल जाधव, दीपक जाधव या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

वाहनांची तोडफोड

संशयितांच्या दोन गटात वाद झाले. त्यांनी एकमेकांना मारहाण करताना लाकडी दांडे व हत्यारांचा वापर केला. एकमेकांवर हल्ला करीत त्यांनी परिसरातील एमएच १५ सीटी ०४८१ व एमएच ०४ बीवाय ८८८२ क्रमांकाच्या कारच्या काचा फोडल्या. यासह एमएच १५ जेएफ ८९३३ व एमएच १५ एफडी ४८८० क्रमांकाच्या दोन दुचाकींची तोडफोड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT