देवळाली कॅम्प : पळसे येथील धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना खा. राजाभाऊ वाजे. समवेत व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक जगन्नाथ आगळे, नानेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, कामगार नेते अशोकराव जाधव यांच्यासह पतसंस्थेचे संचालक मंडळ. Pudhari News Network
नाशिक

Nashik | पतसंस्था ही सामान्यांची अर्थवाहिनी : खासदार राजाभाऊ वाजे

धनसमृद्धी पतसंस्थेचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प (नाशिक) : शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी आर्थिक स्रोत असणाऱ्या पतसंस्था सामान्यांची अर्थवाहिनी आहे. नाशिक तालुका कार्यक्षेत्र असणारी धनसमृद्धी नागरी पतसंस्था निश्चितच गरजूंच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावेल, असा आशावाद खा. राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.

पळसे येथे धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन खा. वाजे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, नाशिक जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष नारायण वाजे, नाशिक रोड- देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक जगन्नाथ आगळे, शरद जाधव, मनपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, प्रशांत दिवे, उदय सांगळे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी पतसंस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष श्यामराव गायधनी, उपाध्यक्ष शरद ढमाले, जनसंपर्क संचालक मनोज गायधनी आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

Nashik Latest News

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT