देवळा पोलीसांच्या धडक कारवाई आरोपी कडून जप्त केलेला मुद्देमाल समवेत पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते आदी (छाया ; सोमनाथ जगताप) 
नाशिक

Nashik Crime | देवळा पोलिसांची धडक कारवाई, अपहरण करुन व्यापाऱ्याच्या मृत्‍यूस जबाबदार आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

२५ लाख रुपयांची खंडणीची केली होती मागणी, मारहाणीत झाला होता व्यापाऱ्याचा मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

देवळा ;अपहरण, खंडणीची मागणी करुन तालुक्यातील पिंपळगाव येथील एका व्यापाऱ्याच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या व जबरी चोरी केलेल्या आरोपिंकडुन पिकअप गाडी व गुटख्यासह एकुण 2816064 रुपयांचा माल देवळा पोलिसांनी हस्तगत केला . पोलिसांच्या या तात्काळ धकड कारवाईने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की ,देवळा पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक १२ रोजी चालक इलीयास सुलतान बागवान (४४), रा. बागवानपुरा, वरचे गाव, चांदवड यांच्या फिर्यादीवरु आरोपीं विरोधात कलम 105, 204, 126(2), 309(6), 308(2), 140(2), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. फिर्यादी व मयत जब्बार चांद तांबोळी हे पिकअप गाडी MH-15-HH-8861 हीच्या मध्ये गुटखा घेवुन येत असतांना त्यांना रस्त्यात अडवुन त्यांचे अपहरण करुन गुन्हा दाखल न होवु देण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागीतली होती. तसेच त्यांच्या ताब्यातील पिकअप गाडी व माल बळजबरीने घेवुन फरार झाले होते.

जब्बार चांद तांबोळी यांचेशी झटापटी करुन त्यास दमदाटी करतांना व बळजबरी गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला जात असतांना त्यात त्यांचा मृत्यु झाला होता. सदर गुन्ह्यात जब्बार तांबोळी यांचा मृत्यु झाल्याने त्याचे पडसाद संपुर्ण नाशिक जिल्ह्यात पडलेले होते. अशा सामाजिक दृष्ट्या अंत्यंत संवेदनशिल असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान देवळा पोलीसांसमोर उभे ठाकले होते. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव , उपविभागिय पोलीस अधिकारी कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते हे करित होते. यातील आरोर्पीना ताब्यात घेतले असुन ,अटक करण्यात आली आहे .

सदर आरोपींला न्यायालयासमोर उभे केले असतां त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . आरोपीने सदर पिकअप गाडी ही सटाणा पोलीस ठाणे हद्दीत ढोलबारे ते पारनेर रोड लगत पडीत शेतात गुटख्यासह लपवुन ठेवलेली होती. पोलीसांनी मोठ्या शिताफीने सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात एकुन 22,16,064/- रुपयाचा गुटखा व पिकअप गाडीसह एकुन 28,16,064/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, पोउपनिरिक्षक विनय देवरे, पोहवा नितिन बाराहाते, पोलीस अंमलदार योगेश जामदार, दिलीप सोनवणे यांचे पथकाने केलेली आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी सदरच्या कामगिरीबाबत देवळा पोलीस ठाणे पथकाचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT