Police Pudhari
नाशिक

Nashik Crime Branch | फाइल्स गहाळ प्रकरण तपासासाठी युनिट 1 कडे

Nashik Crime Branch | पीटीसीसमोरील जागेच्या संचिका 2003 पासून गायब

पुढारी वृत्तसेवा

नाशिकः पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक रोड येथील पीटीसीसमोरील जागा सर्व्हे क्र. ७५०, ७५१ व ७५५ संदर्भातील महत्त्वाच्या फाइल्स गायब झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

याबाबत स्वप्निल कृष्णा अहिरे (४१) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २००३ पासून आजपर्यंतच्या कालावधीत तहसील कार्यालय परिसरातून सर्व्हे क्र. ७५०, ७५१ व ७५५ या मिळकतींशी संबंधित संचिका कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भात नाशिक विभागाच्या राज्य माहिती आयुक्तांनी दि. १२ ऑगस्ट २०२५ च्या सार्वजनिक अभिलेख अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ११ फेब्रुवारीस फिर्याद दाखल करण्यास प्राधिकृत केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रकरणातील कागदपत्रे गायब होण्यामागील नेमके कारण व जबाबदार व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. याबाबत सहायक महसूल अधिकारी स्वप्निल अहिरे यांनी फिर्याद दिली.

दिगंबर त्रिलोकचंद आहिरवार (रा. त्र्यंबक रोड) यांनी २६ नोव्हेंबर २०१५ ला माहिती अधिकार अधिनियमानुसार अंतर्गत अर्ज दाखल करत संबंधित टेनन्सी केसेसच्या निर्णयाची प्रत, कब्जा पावती व मंडळ अधिकाऱ्यांच्या आदेशाची नक्कल मागितली होती. तत्कालीन जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित संचिकांचा शोध सुरू असल्याचे कळविले होते. त्यानंतर अर्जदाराने प्रथम व द्वितीय अपील दाखल केले.

राज्य माहिती आयुक्तांनी २०१८ अहवाल न्यायालयात मध्ये दिलेल्या आदेशानुसार अभिलेखांचा कसून शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर अनेक वेळा शोध पथके नेमण्यात आली.

संबंधित काळातील कुळकायदा लिपिक दिलीप वामन यांच्याकडूनही खुलासे मागविण्यात आले. त्यांच्या निवेदनानुसार संचिका वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचा उल्लेख आहे. मात्र, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार त्या संचिका तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वारंवार पत्रव्यवहार, नोंदवही तपासणी व शोध मोहिमेनंतरही संबंधित संचिकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. नोंदीवरील स्वाक्षऱ्या असलेले अधिकारी निधन पावल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.

त्यामुळे संचिका उद्देशपूर्वक लपविणे अथवा चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. राज्य माहिती आयुक्तांच्या १२ ऑगस्टच्या आदेशान्वये आणि तहसीलदारांच्या प्राधिकृत पत्रानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT