नाशिक : वाहतूक पोलिस शाखेच्या कर्मचाऱ्याला वाहनाची धडक देऊन जखमी करणाऱ्यास १३ वर्षानंतर न्यायालयाने एक दिवस न्यायालयात कामकाज संपेपर्यंत पर्यंत उभे राहण्याची शिक्षा व चार हजाराचा दंड नाशिक येथील न्यायालयाने ठोठावला आहे. समाधान चंद्रकांत साळवे (२६ रा. दुडगाव) असे शिक्षा ठोठाविलेल्या आरोपीचे नाव आहे.
नाशिक पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील सरकारवाडा ठाणे हद्दीत २५ ऑक्टोबर १२ रोजी दुपारी १२ वाजता गोल्फक्लब सिंग्नलजवळील जलतरण तलावाजवळ हा प्रकार घडला होता. वाहतूक शाखेचे कर्मचारी हवालदार आनंदसिंग नारायणसिंग राजपूत हे कर्तव्यावर असताना समाधान चंद्रकांत साळवे हा दुचाकी (एम.एच. १५ ओ.सी. ७१३१) ने मायको सर्कलकडून सिव्हील हॉस्पीटलकडे भरधाव जात असताना त्याने सिग्नल तोडला. यावेळी राजपूत यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने राजपूत यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
साळवे याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व वाहनाचे कागदपत्र देखील नव्हते. राजपूत यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात साळवे याच्यावर कलम २७९, ३३७, ४२७ व मोटार वाहन कायदा कलम १८४, ३ (१), १८१ व ११९/१७७ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास हवालदार जे. जे. शेख, तत्कालीन सरकारवाडा पोलीस ठाणे केला. आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने विशेष केले. आरोपीविरूध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक कोर्ट ६ वे येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी कं. ६ वे, नाशिक येथे सुरू होती. १९ रोजी सदर गुन्ह्यातील आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतास सीआरपीसी कलम २५५ (२) अन्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता म्हणून एस. एस. चिताळकर यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी पोलिस अंमलदार एस. एस. भांड, नेमणूक सरकारवाडा पो. ठाणे तसेच हवालदार जी. ओ. भोसले यांनी सदर गुनह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला. तर गुन्ह्यातील सहा. सरकारी अभियोक्ता, तपासी अंमलदार व कोर्ट अंमलदार यांनी गुन्हा सिद्ध होण्याचे दृष्टीने केलेल्या कामगिरीबद्दल, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे अभिनंदन केले.