नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच पक्ष आक्रमकपणे प्रचारात उतरले असताना काँग्रेस मात्र कोमात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत उमेदवारांना ताकद देण्याची गरज असताना पक्षाने त्यांची साथ सोडल्याने उमेदवार पोरके झाल्याचे बघावयास मिळत आहे. शहराध्यक्ष हे 'नॉट रिचेबल' असतात, वरिष्ठ नेत्यांचे नाशिककडे दुर्लक्ष यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे पक्षातून उरलेसुरले पदाधिकारीही पक्ष सोडत असल्याने काँग्रेसची वाताहत होत आहे. एकेकाळी नाशिक पक्षाचा बालेकिल्ला होता. महापौरपद भूषणवणाऱ्या पक्षाचे गत निवडणुकीत काँग्रसचे सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु, यातील पाच माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडले आहे. निवडणुकीतील जागा वाटपापासून ते तिकीट वाटपापर्यंत पक्षाने गोंधळ घातल्याने अनेक निष्ठावंतांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर नाराजांनी थेट काँग्रेस कार्यालयाला कुलूप ठोकले. तर काही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचे आरोप केले. या सर्व राजकीय घडामोडीत वरिष्ठांकडून डॅमेज कंट्रोलसाठी कोणतेही प्रयत्न होऊ शकले नाहीत. आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला १२ जागा आल्या असतानाही शहरात २३ जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी उमेदवारी वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली. परंतु, त्यानंतर त्या आहेत. शहराध्यक्षांविरोधातही एक गट नाराज असून, इतर नेतृत्वाच्या तुलनेत वे नवखे असल्याने त्यांचा फारस प्रभावही दिसून येत नाही. भाजप, शिं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना काँग्रेस भवनात मात्र शुकशुकाट आहे. सेवा दल निवडणुकीतून अलिप्त शहर काँग्रेस सेवा दलाने काँग्रेसकडे २० जागांची मागणी केली. मात्र, शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी एकाही जागेवर उमेदवारी दिली नाही. परिणामी, काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असून, त्यांनी शहराध्यक्षांवर वैयक्तिक स्वार्थासाठी व आर्थिक हितसंबंधांसाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
पक्षाची सारी भिस्त युतीच्या सभेवर
सर्व राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. काँग्रेस पक्षाकडून कोणतेही नेते प्रचारासाठी फिरकायला तयार नाही. कोणत्याही नेत्यांचे सभेचे देखील नियोजन नाही. पक्षाची सारी भिस्त ही उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे यांच्या सभेवर आहे. या सभेतच पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला जाणार आहे.