नाशिक : पुढारी वृत्तसेवा– पाच राज्यांच्या निवडणूकीत तेलंगणा वगळता काँग्रेसला इतर राज्यांत अपेक्षीत यश मिळाले नाही. त्यामुळे शहर काँग्रेसच्या कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. येथे पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जास्त वावर दिसला नाही.
राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व मिजोरम या राज्यांमधील निवडणूकीकडे लोकसभेची रंगीत तालिम म्हणून बघितले जात होते. निवडणूकींमध्ये भाजपा व काँग्रेस पक्षाने झोकून प्रचार केला व विजय आमचाच असा दावाही केला. मात्र मतमोजनीनंतर भाजपाचा वरचष्मा दिसला. तेलंगणा वगळता काँग्रेसला चारही राज्यांत बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात निराशा दिसली. शहरातही निकालामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसला नाही. महात्मा गांधी रोडवरील पक्षीय कार्यालयात रोजचे कार्यकर्ते वगळता कोणीही दिसले नाही.
हेही वाचा :