नाशिक : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास पिंक ई रिक्षातून केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून वैष्णवी साकोरे यांच्या रिक्षातून त्यांनी प्रवास करत महिला चालकेशी संवाद साधला.
पर्यावरणाबाबत नेहमीच जागरूक असून जिल्हाधिकारी महिन्यातून एक दिवस वाहन न वापरता ते कार्यालयात येतात. या उपक्रमातून प्रदूषण कमी करणे, इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत ही उद्दिष्टे आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे.जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक
जिल्हाधिकारी शर्मा यांनी निवासस्थान ते कार्यालयापर्यंतचा प्रवास माझ्या रिक्षातून केला. हा माझा बहुमान असून, त्यामुळे मनोबल वाढले आहे.वैष्णवी उमाकांत साखरे, रिक्षा चालक