City Link Nashik Pudhari file photo
नाशिक

Nashik Citylink ETIM Bus | सिटीलिंकमध्ये यूपीआय, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे तिकीट

Nashik Citylink ETIM Bus | महापौर आडके यांच्या हस्ते आज 'ईटीआयएम' यंत्रणेचा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंक प्रवाशांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत असून, बसमधील तिकीट वितरणासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तिकीट वितरण यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.

या सुविधेचा शुभारंभगुरुवारी (दि. २५) महापौर हिमगौरी आहेर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमामुळे सिटीलिंकच्या दैनंदिन तिकीट वितरण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊन सेवा अधिक सुसूत्र आणि कार्यक्षम होणार आहे.

नवीन ईटीआयएम मशीनच्या माध्यमातून प्रवाशांना यूपीआय, डेबिट कार्ड तसेच क्रेडिट कार्डद्वारे तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट तत्काळ तयार होत असल्याने तिकीट वितरणातील विलंब कमी होईल. तसेच सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वादही टळणार आहेत. या यंत्रणेमुळे तिकीट व्यवहारांची अचूक नोंद होणार असून, महसूल व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.

भाडे, मार्ग, टप्पे आणि सवलती यांची माहिती प्रणालीमध्ये UPI उपलब्ध आधीपासून असल्याने मानवी चुका कमी होतील आणि तिकीट वितरण अधिक जलद व अचूक होईल. याशिवाय, वाहकांना तिकीट फाडणे, भाडे मोजणे आणि नोंदी ठेवण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असल्याने त्यांना प्रवासी व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. तिकीट तपासणी प्रक्रियेतही प्रवाशांना अधिक सोय होणार आहे.

स्मार्ट सिटी संकल्पनेला पूरक अशा आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. नाशिककरांनी या आधुनिक सुविधेचा लाभ घेत सिटीलिकच्या सेवांचा अधिकाधिक वापर करावा.
- विजयकुमार मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिटीलिंक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT