Prabodhankar Thackeray Sabhagruh 
नाशिक

Prabodhankar Thackeray Sabhagruh | प्रबोधनकार ठाकरे सभागृह बनला टवाळखोरांचा अड्डा

Prabodhankar Thackeray Sabhagruh | खर्च झालेल्या निधीच्या चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील स्वामी विवेकानंद नगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृह २०१९ पासून नाशिक मनपा बंद केले असल्याने परिसरात टवाळखोर व दारुड्यांचा वावर वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मनपा प्रशासकीय राजवटीत सभागृहावरील खर्चाची चौकशी करून ते पुन्हा शिवछत्रपती सामाजिक मंडळाच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी केली आहे. सभागृहाच्या परिसरात नागरिकांसाठी फिरण्याचा ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जीम व खुली व्यायामशाळा आहे.

मात्र, व्यायाम साहित्य तुटले आहे. सभागृह बंद असल्याने सायंकाळच्या वेळेत येथे टवाळखोर, दारुड्यांचा वावर वाढला आहे. महिला व परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शिवछत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या ताब्यात हे सभागृह १८ ते १९ वर्षे होते.

मंडळाच्या माध्यमातून अत्यल्प भाड्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या विवाह सोहळ्यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवले जात होते. मात्र, महापालिकेने रेडीरेकनरनुसार नवीन भाडेदर लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०१९ मध्ये सभागृह ताब्यात घेऊन ते सील केले.

प्रशासकीय कार्यकाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून प्रबोधनकार ठाकरे सभागृह आणि संभाजी स्टेडियमसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीपैकी सभागृहावर नेमका किती खर्च झाला, कोणती कामे करण्यात आली आणि त्यांची सद्यः स्थिती काय आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT