सिडको ( नाशिक ) : तब्बल १९ वर्षांपासून सिडकोतील लेखानगर चौकात सप्तशृंगी मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. २००६ पासून सुरू झालेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यंदाच्या वर्षी मंडळातर्फे कर्नाटक येथील म्हैसूरच्या श्री चामुंडेश्वर देवी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे व सभापती कल्पना चुंभळे यांच्या पुढाकाराने देवीची प्राणप्रतिष्ठा करण्याची संकल्पना मांडली गेली. तेव्हापासून दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात नऊ दिवस भाविकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नऊ दिवस देवीची विधिवत पूजा व आरती केली जाते. मंडळाच्या सहभागातून तसेच शिवाजी चुंभळे यांनी सप्तशृंगी देवीच्या मूर्तीसाठी सोने-चांदीच्या दागिन्यांतून साजशृंगार तयार केला आहे.
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पहाटे मंडळातर्फे दूधवाटप, फराळाचे पदार्थ, फळांचे वाटप भाविकांना केले जाते. धार्मिक कार्यक्रमांंबरोबरच मंडळतर्फे आरोग्य शिबिरांसह इतर विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते.