Nashik Crime News Pudhari
नाशिक

Nashik Crime : सिडकोत पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरूणाचा निर्घृण खून, दोघे ताब्यात

महालक्ष्मी नगर परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

सिडको : अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी नगर, नवनाथ नगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल हिरवाळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महालक्ष्मी नगर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT