सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात दिवसाढवळा घर फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (दि.२६) अटक केली. त्याच्याकडून १७ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. अरूण दाभाडे (५२, रा. कोळीवाडा) असे या संशयिताचे नाव आहे.
बाऱ्हे येथील रहिवासी सुनील राऊत यांचे घर फोडून चोरट्याने लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी बाऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू होता. यादरम्यान घरफोडी करणारा चोरटा नाशिकमधील असल्याची माहिती बाऱ्हे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अरूण दाभाडे या चोरट्याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अरूण दाभाडे हा सराईत चोरटा असून त्याच्यावर नाशिकमधील भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड, पिंपळगाव, कळवण, इगतपुरी, सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सपोनि किशोर जोशी, सपोनि संदेश पवार, बा-हे पोलिस ठाण्याचे सपोनि सोपान राखोंडे, तसेव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, नवनाथ सानप, पोहवा किशोर खराटे, सचिन देसले, संदिप नागपुरे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, विनोद टिळे, हेमंत गरूड, मनोज सानप, योगिता काकड, ललिता शिरसाठ, तसेच अमोल गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, कुणाल वैष्णव, तृप्ती पवार, प्रजक्ता सोनवणे यांनी केली.