Nashik Bribe News
भुकरमापकास 35 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले File Photo
नाशिक

Nashik Bribe News |40 गुंठ्यांच्या मोजणीसाठी भुकरमापक लाच घेताना जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : त्र्यबंकेश्वर येथील ४० गुंठे क्षेत्राची माेजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच घेताना भुकरमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सचीन भाऊसाहेब काठे (३७, रा. दसक, जेलरोड) असे पकडलेल्या भुकरमापकाचे नाव आहे.

त्र्यंबकेश्वर येथील मौजे अंजनेरी येथे तक्रारदारास ४० गुंठे क्षेत्राची मोजणी करायची होती. तसेच क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयात संपर्क साधला. त्यावेळी प्रभारी भुकरमापक काठे याने तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने काठे याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. बुधवारी (दि.२६) तक्रारदारासोबत तडजोड करीत काठे याने ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काठे यास रंगेहाथ पकडले.

यांनी केली कारवाई

विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, हवालदार प्रभाकर गवळी, नाईक संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. याप्रकरणी काठे विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काठे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT