Bribe News  File Photo
नाशिक

Nashik Bribe News | लाचखोर विपणन अधिकारी 'सीबीआय एसीबी'च्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयांच्या अखत्यारीतील कार्यालयात तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरिष्ठ विपणन अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. (A senior marketing officer has been caught red-handed by CBI's anti-corruption wing)

दत्त मंदिर परिसरात दुरसंचार इमारतीत एगमार्क कार्यालयात पथकाने ही कारवाई केली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.२) ही कारवाई केली. तक्रारदाराकडून कार्यालयातील वरिष्ठ विपनन अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून काम करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची मागितली. त्यामुळे तक्रारदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. त्यानुसार सोमवारी (दि.2) लाच घेताना संबंधित अधिकाऱ्यास पथकाने पकडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT