जुने नाशिक : येथील मदिना चौक परिसरातील अमर बुक डेपोला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाले. वह्या, पुस्तके आदी स्टेशनरी साहित्यासह प्रिंटींग मशिनरी या आगीत जळून भस्मसात झाली.
अग्निशामक दलाच्या पथकाने तब्बल दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळविले. शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली.
आगीचे स्वरूप मोठे असल्याने शिंगाडा तलाव येथील मुख्यालयातून तसेच सिडको अग्निशमन केंद्रातूही बंब मागविण्यात आले. लिडिंग फायरमन सोमनाथ थोरात, विजय शिंदे, उदय शिरके, मेनुद्दीन शेख, कांतीलाल पवार, नितीन मसके, हर्षद पटेल आदींनी तातडीने आग विझवून मोठी दुर्घटना टाळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा इजा झालेली नाही.