sonography machine 
नाशिक

Nashik Bitco Hospital | नाशिकरोडच्या 'बिटको' रुग्णालयात 7 वर्षांनंतर सोनोग्राफी सुरू; गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

Nashik Bitco Hospital | सुविधांपेक्षा असुविधांनीच कायम चर्चेत राहणाऱ्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधा प्रदीर्घ काळानंतर सुरू करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सुविधांपेक्षा असुविधांनीच कायम चर्चेत राहणाऱ्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधा प्रदीर्घ काळानंतर सुरू करण्यात आली आहे. गेल्या सात वषपिक्षा अधिक काळापासून रेडिओलॉजिस्ट (तज्ज्ञ डॉक्टर) आणि तंत्रज्ञांच्या अभावी सोनोग्राफी मशीन बंद अवस्थेत होती. यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.

माजी नगरसेवक तथा आरोग्यसेवक जगदीश पवार यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर सोनोग्राफी मशीन सुरू करण्यात आली आहे. बिटको रुग्णालयात नाशिकरोडसह पंचक्रोशीतील ३० ते ३५ खेड्यांमधील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात.

कोविड काळात सर्वाधिक रुग्णांना जगविणारे रुग्णालय म्हणून बिटकोचा गौरव करण्यात आल्याने, हे रुग्णालय गोरगरिबांसाठी वरदानच आहे. मात्र, रुग्णालयात काही सुविधा मनुष्यबळाअभावी तसेच अन्य क्षुल्लक कारणांवरून वर्षानुवर्षांपासून दिल्या जात नसल्याने, गोरगरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

सोनोग्राफी मशीन गेल्या सात वर्षांपासून केवळ तज्ज्ञ डॉक्टर नसल्याकारणाने बंद होती. त्यामुळे सोनोग्राफीसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसतानाही नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात मोठा भुर्दंड सहन करावा लागायचा.

सोनोग्राफी मशीन तत्काळ सुरू केली जावी, यासाठी जगदीश पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन, तसेच प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन त्यांनी सोनोग्राफी मशीन सुरू केली जावी, अशी मागणी लावून धरली होती.

प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सोनोग्राफी मशीन सुरू झाली असली तरी, रुग्णालयात अजूनही बऱ्याच सुविधा बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे त्या देखील तत्काळ सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

या सुविधांची गरज त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञाचा अभाव जळीत कक्ष बंद असल्याने मोठी गैरसोय हाडाच्या, दाताच्या शस्त्रक्रिया होत नाहीत कृष्णा लॅब महापालिकेने चालवावी एमआरआयचे दर कमी करावेत रुग्णालयात पाण्याची मोठी समस्या मनुष्यबळाचा अभाव असल्याने गैरसोय मेडिसिनचा तुटवडा असल्याने उपचारात अडचणी

गोरगरीब रुग्णांसाठी सोनोग्राफी मशीन सुरू व्हावी, यासाठी अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली. आता मशीन सुरू झाली आहे. आता कुठल्याही कारणामुळे ती बंद पडू नये हीच अपेक्षा.
- जगदीश पवार, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT