नाशिक

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध

गणेश सोनवणे

देवळा ; पुढारी वृत्तसेवा ; देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री अतुल पवार यांची तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला. ह्या रिक्त पदांच्या जागेसाठी सोमवारी दि. ६ सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली देवळा नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांना सूचक म्हणून जितेंद्र आहेर व अनुमोदन म्हणून अशोक आहेर यांनी स्वाक्षरी केली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी मनोज राजाराम आहेर यांना सूचक म्हणून संजय आहेर यांनी तर अनुमोदन म्हणून कैलास पवार यांनी स्वाक्षरी केली. नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार व उप नगराध्यक्ष पदासाठी मनोज आहेर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुलभा आहेर, माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर नगरसेवक जितेंद्र आहेर, संजय आहेर, भारती आहेर, शीला आहेर, कैलास पवार, राखी भिलोरे, करण आहेर, रत्ना मेतकर, एश्वर्या आहेर, भूषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी, सुनंदा आहेर, संतोष शिंदे, योगेश आहेर, हितेश आहेर, मुख्याधिकारी श्यामकांत जाधव आदींसह कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार व उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांची निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी पचकांदिल शिवस्मारक परिसरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा नाना आहेर, बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर, डॉ. कोमल निकम, डॉ.प्रशांत निकम, देमको च्या चेअरमन कोमल कोठावदे, योगेश वाघमारे, युवराज आहेर, हर्षद भामरे, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

SCROLL FOR NEXT