नाशिक

Nashik | डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात "बेटी बचाव बेटी पढाओ"ची शपथ

अभियानाची सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक | आजपासून सुरु होणाऱ्या "बेटी बचाव बेटी पढाओ" या अभियानांतर्गत डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात सर्व अधिकारी, कर्मचारी, रुग्ण, दिव्यांग बांधव, रुग्णांचे नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते जुबेर हाश्मी, वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन रावते व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली व अभियानाची सुरुवात करण्यात आली.

हे अभियान 8 मार्च २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे या मोहीमेअंतर्गत कार्यवाही केली जाणार आहे.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी फक्त प्रशासकीय कार्यवाही पुरेशी नसून त्यासाठी समाजातील सर्व स्तरांमधील सर्व नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. स्त्री भ्रूण हत्या कोठेही होत असल्याबद्दल कोणत्याही नागरिकाला काही माहिती अथवा शंका उत्पन्न झाल्यास त्यांनी नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर किंवा पोलीस स्टेशनला तसे त्वरित कळवावे जेणेकरून त्याला आळा घालणे व स्त्री जन्मदर वाढवणे शक्य होईल असे मत रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT