नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक शहर विभाग-२ अंतर्गत टाकळी येथील १३२ केव्ही उपकेंद्रावर ३३ केव्ही वाहिनीचे दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
त्यामुळे शनिवारी (दि. २०) सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत द्वारका, उपनगर, नाशिकरोड परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित होणार आहे. विद्युत भार योग्यरीत्या विभागला गेला नाही, तर पूर्ण वेळ वीजपुरवठा बंद राहू शकतो. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यास विलंबाने वीजपुरवठा सुरळित होईल, असे महावितरणने कळवले आहे.
नाशिक शहरात आज शनिवारी (दि. २०) रोजी, तांत्रिक दुरुस्ती आणि जलवाहिनी देखभाल दुरुस्तीमुळे शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे आणि रविवारी (दि. २१) देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील विविध जलकुंभ व जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे किमान दोन दिवस नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.